करतारपूर साहिब यात्रेसाठी हवा फ्री व्हिसा

भारताची पाकिस्तानकडे मागणी ः दिवसाला 5000 भाविकांना दर्शन घेण्याची हवी परवानगी

अतारी/नवी दिल्ली – पुलवामा दशहतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यात आता भारताने पाकिस्तानकडे करतारपूर साहिब यात्रेसाठी मोफत व्हिसा करण्याची मागणी केली आहे. गुरुद्वारा करतारपूर साहिबसाठी कॉरिडोर तयार करण्यासाठी गुरुवारी अटारीमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सचिव स्तरावर पहिली बैठक झाली. पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांर्तगत ही पहिलीच बैठक पार पडली. यावेळी पाकिस्तानचे विदेश मंत्रालयाचे महासंचालक मोहम्मद फैजल उपस्थित होते. या बैठकीमध्ये व्हिसासंबंधी काही मागण्या भारताकडून करण्यात आल्या. यासंबंधी पुढील बैठक पुढील महिल्यात 2 एप्रिल रोजी वाघामध्ये आयोजित करण्यात आली आहे.

अटारीमध्ये झालेल्या बैठकीनंतर सहसचिव एससीएल दास यांनी सांगितले की, भारताने पाकिस्तानकडे करतारपूर साहिब यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना व्हिसाशिवाय यात्रा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर दिवसाला 5000 भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी देण्यात यावी अशीही मागणी भारताकडून करण्यात आली आहे.
या प्रकरणात दोन्ही देशांच्या बैठकीच्या आधी पाकिस्तानने भारताला 59 पानांचे एक दस्तावेज पाठवले होते. त्यात पाकिस्तानकडून 14 मागण्यात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या मागण्यांवर दोन्ही देशांची सहमती होणार का हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)