वायुसेनेचे गायब झालेले एन-32 विमान अखेर सापडले

भारतीय वायुसेनेने ट्‌वीट करून दिली माहिती

नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेश येथे साधारण आठ दिवसांपुर्वी अचनकपणे गायब झालेले भारतीय वायुसेनेचे एन-32 हे मालवाहु विमान अखेर सापडले असुन भारतीय वायुसेनेने ट्विटरवरुन त्याची माहिती दिली आहे. अरुणाचल प्रदेशातल्या पश्‍चिम सियांग जिल्ह्यातल्यात लिपोच्या उत्तरेकडे हे विमान कोसळले असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतीय वायुसेनेची एमआय-17 हेलिकॉप्टर्स याची शोध मोहीम राबवत आहेत.

या विमानातील कुणी वाचले आहे का, याचा शोध सध्या घेतला जात आहे. या विमानाला बेपत्ता होऊन साधारण 8 दिवस झाले होते.

सोमवार दिनांक 3 जून रोजी दुपारी 12.27 वाजता आसाममधल्या जोरहाट विमानतळावरून भारतीय वायुदलाच्या एन-32 या मालवाहू विमानाने झेप घेतली होती. मात्र, दुपारी 1 वाजता विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आणि तेव्हापासून या विमानाचा आणि त्यात असलेल्या हवाई दलाच्या 13 कर्मचाऱ्यांचा कुणालाच पत्ता नव्हता. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोदेखील जोरहाट आणि अरुणाचल प्रदेशच्या मेचुका या भागात बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध घेत होती. त्याशिवाय सुखोई 30 एमकेआय, एमके17, चिता आणि सी 130 जे सारखी लढाऊ विमाने देखील या शोध मोहिमेत सहभागी झाली होती. त्याच बरोबर वायुदलाने या विमानाची माहिती पुरवणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)