हवाई दलाच्या विमानाच्या इंधनाची टाकी पडली शेतात

कोईम्बतूर – भारतीय वायु सेनेच्या स्वदेशी बनावटीच्या तेजस या लढाऊ जेट विमानाची इंधन टाकी मंगळवारी सकाळी 8 वाजुन 40 मिनिटांनी तामिळनाडूमधील कोईम्बतुर जिल्ह्यातील एका शेतात पडली. विमान उड्डाण घेत असताना हा प्रकार घडला. या घटनेनंतर सुलुर विमानतळावर हे विमान यशस्वीरित्या उतरवण्यात आले. या घटनेत कोणतेही नुकसान झाले नाही. भारतीय वायु सेनेने घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत.

या इंधन टाकीची क्षमता 1200 लिटर आहे. ही टाकी पडल्यामुळे शेतात तीन फुटाचा खड्डा झाला. घटनास्थळी तुरळक आग देखील लागली होती जी लगेच विझवल्या गेली. या प्रकारामुळे एखादी मोठी दुर्घटना देखील घडू शकली असती मात्र सुदैवाने ती टळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)