बडगावमध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून 6 ठार

बडगाव(जम्मू-काश्‍मीर)  बडगाव जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे एक एम-17 हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती देण्यात आली आहे. सकाळी 10.40 च्या सुमारास बडगावपासून 7 किमी अंतरावर असलेल्या ग्रेंद काला गावाजवळ हे हेलिकॉप्टर कोसळले. विमानाचा पायलट आणि सह पायलट दोघेही या दुर्घटनेत शहीद झाले आहेत आणि अन्य चार जण मारले गेले आहे. कोसळलेल्या विमानाच्या अवशेषातून अन्य तीन मृतदेह हाती लागले आहेत. मात्र पोलीसांनी एकच नागरिक मरण पावल्याचे सांगितले आहे. विमानाचे अवशेष पूर्णपणे बाजूला केल्यानंतरच मृतांची नेमकी संख्या सांगता येईल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मदतकार्यासाठी हवाई दलाचे एक दल दुसऱ्या हेलिकॉप्टरने गेले. मात्र त्यांच्यावर तेथे जमा झालेल्या स्थानिकांनी घोषणाबाजी करत दगडफेक सुरू केली. बेकाबू जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलाला हवेत गोळीबार करावा लागला.यात दोन जण जखमी झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)