एअर डेक्‍कनची छोट्या शहरांसाठी सेवा

मुंबई: एअर डेक्कनतर्फे महाराष्ट्रातील कार्यचलनाला 29 जुलैपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली. एअर डेक्कनद्वारे उडान (उडे देश का आम नागरिक) योजनेअंतर्गत महाराष्ट्रात पुणे, नाशिक, मुंबई, जळगाव आणि कोल्हापूर आदी शहरांतर्गत उड्डाणे पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहेत. नाशिक ते मुंबई (रस्त्यावरून 170 किमी) प्रवास रस्त्यावरून पाच ते सहा तासांचा होतो, तो या सेवेमुळे केवळ 30 मिनिटे इतका कमी होणार आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शैशव शाह म्हणाले की, पुणे, नाशिक, जळगाव आणि कोल्हापूर आदी शहरांना मुंबईशी जोडणारे महाराष्ट्रातील उड्डाण मार्ग आम्ही पुन्हा सुरू करत आहोत.
सामान्य माणूस परवडणाऱ्या किंमतीतील आणि सुलभ मार्गाच्या हवाईमार्गाचा अवलंब करू लागल्यास अर्थव्यवस्थेचा प्रामुख्याने विकास होणार आहे. उडानमुळे आपल्या देशातील नागरिकांसाठी विमान प्रवास परवडणाऱा आणि विस्तृत मार्गाचा होणार आहे. या विमान कंपनीने 2017 मध्ये पुन्हा विमान फेऱ्यांना सुरुवात केली आहे. तसेच या वर्षी मार्चमधल्या बिडिंगच्या पहिल्या फेरीत रिजनल कनेक्‍टिव्हिटी स्कीम (आरसीएस)च्या प्रक्रिया राबवण्याचे हक्क जिंकले आहेत. देशभरातील 128 मार्ग कंपनीने मिळवले आहेत, यात महाराष्ट्रस्थित नऊ मार्गांचा समावेश आहे. सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत विमान प्रवास करता यावा, पर्यटनाला चालना मिळावी, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि संतुलित प्रादेशिक विकास व्हावा अशी रिजनल कनेक्‍टिव्हिटी स्कीमची उद्दिष्ट्‌े आहेत. याबरोबरच वंचित आणि दुर्लक्षित विमानतळांना जीवनदान देण्याचाही हेतू यामागे आहे, असेही शाह म्हणाले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)