रशियात विमानाला भीषण आग, 41 प्रवाशांचा मृत्यू 

मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये काल रात्री आपत्कालीन लँडिंग करताना ‘सुखोई सुपरजेट-100’ या प्रवाशी विमानाला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे विमानातील तब्बल 41 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांचादेखील समावेश आहे.

मॉस्कोवरुन या विमानाने रशियाच्या म्युरमॅनस्क शहरासाठी उड्डाण केले होते. उड्डाण केल्यानंतर विमानाच्या इंजिन मध्ये बिघाड झाल्यामुळे विमानाच्या मागच्या बाजूने अचानक पेट घेतला. त्यामुळे लगेचच हे विमान पुन्हा विमानतळाच्या दिशेने फिरवण्यात आले. दरम्यान विमानाने पेट घेतल्यानंतर जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी अक्षरश: पेटत्या विमानातून बाहेर उड्या मारल्या. मात्र, विमानाला आग नेमक्या कोणत्या कारणास्तव लागली हे अजून स्पष्ट आलेले नाही.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार विमानात एकूण 78 प्रवाशांसह 5 क्रू मेंबर या विमानात प्रवास करत होते. ‘एअरोफ्लोट एअरलाइन्स’ कंपनीचे हे विमान होते.

https://twitter.com/bazabazon/status/1125066711588331523

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)