सिरीयामधील अलेप्पोवर हवाई हल्ला 

संग्रहित छायाचित्र

बंडखोरांकडून रासायनिक हल्ल्याने 100 जण बाधित 

बैरुत: सिरीयामध्ये बंडखोरांच्या ताब्यातील अलेप्पो शहराच्या पश्‍चिमेकडील भागावर रविवारी हवाई हल्ला करण्यात आला. सिरीयातील सरकारी ताब्यातील भागावर शनिवारी विषारी गॅसचा हल्ला झाला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बंडखोरांवर हा हवाई हल्ला करण्यात आला, असे ब्रिटनस्थित मानवी हक्क निरीक्षकांनी सांगितले. बंडखोरांवरील हवाई हल्ला सिरीया सरकारशी जवळीक असलेल्या रशियाने केला असल्याचा अंदाजही या निरीक्षकांनी व्यक्‍त केला.

-Ads-

सरकारी बाजूच्या रशिया आणि बंडखोर समर्थक तुर्कीने इडलिब भाग लष्कर विरहीत करण्याचे सप्टेंबरमध्ये मान्य केले. इडलिब भाग पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शासनाकडून मोठी जिवितहानी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. मात्र अल कायदाशी संबंधित हयात ताहिर अल शाम या संघटनेकडून शनिवारी अलेप्पो शहरावर रासायनिक अस्त्रांचा हल्ला केला गेला. त्या हल्लमध्ये सुमारे 100 जणांना विषारी वायूमुळे श्‍वसनास त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
3 :cry: Sad
3 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)