जागतिक बॉक्‍सिंग अजिंक्‍यपद स्पर्धा : मेरी कोमला विक्रमी सहावे विजेतेपद

नवी दिल्ली – येथील राजीव गांधी स्पोर्टस कॉम्पलेक्‍स येथे जागतिक बॉक्‍सिंग अजिंक्‍यपद स्पर्धेत भारताची स्टार महिला बॉक्‍सर मेरी कोम हिने 48 किलो वजनी गटातील अंतिम सामन्यात युक्रेनच्या हाना ओखोटाला 5-0 असे नमवत सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. अशी कामगिरी करत तिने केटी टेलरच्या पाच विजेतेपदांचा विक्रम मोडत सर्वाधिक अजिंक्‍यपद जिंकणारी महिला बॉक्‍सर बनली आहे. तर सार्वकालीन महान पुरुष बॉक्‍सर क्‍युबाच्या फेलिक्‍स सावोनच्या सहा अजिंक्‍यपद विजेतेपदाशी तिने बरोबरी केले आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच मेरीने वर्चस्व गाजवले. पहिल्या फेरीची सुरुवात मेरीने चांगली केली. या फेरीच्या शेवटी हाना ओखोटाचा खेळ देखील उत्तम झाला. परंतु, मेरी कोमच्या बचावासमोर तिला काही विशेष कामगिरी करता आली नाही. यानंतर दुसऱ्या फेरीत मेरीने वर्चस्व गाजवताना हानाला प्रतिकाराची संधी दिली नाही. तर, तिसऱ्या फेरीत मेरीने आपला खेळ आणखिन उंचावत प्रतिस्पर्धी खेळाडूवर दबाव वाढवला आणि विजयाच्या दिशेने कूच केली.

पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये बचावात्मक आणि आक्रमक खेळावर जोर देत हानाला संपुर्ण सामन्यात निष्प्रभ केले होते. त्यामुळे संपुर्ण सामन्यावर सर्वस्व तीचेच वर्चस्व राहिले होते. यावेळी हानाने थोडाफार प्रतिकार करण्याचा अपयशी प्रयत्न केला. मात्र, सामन्यावर मेरीचाच दबदबा कायम राहिला. यावेळी सर्व पाच पंचानी निकाल दिल्यावर मेरी कोमने अंतिम सामना 5-0 असा जिंकत अजिंक्‍यपद स्पर्धेतील आपले सहावे सुवर्णपदक पटकावले.

आपल्या कारकिर्दीच्या सुरूवातीला 2001 मध्ये तिने जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत 48 किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली होती. तिथे तिला अंतिम सामन्यात हार पत्करावी लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर तिने 2002, 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018 मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. वयाच्या पस्तिशी गाठूनही तिच्या चापळाईमध्ये आणि वेगात कमीपणा आलेला नाही. ती आपल्या तंदुरुस्तीवर अधिक मेहनत घेते आहे. त्याचे हे फळ आहे.

जागतिक बॉक्‍सिंग अजिंक्‍यपद स्पर्धेतील कामगिरी

साल -ठिकाण- कामगिरी

2001-स्क्रॅनटन (यूएस)- उपविजेतेपद
2002 -अंताल्या (तुर्की )- विजेतेपद
2005 -पोडलस्क (रशिया)- विजेतेपद
2006 -नवी दिल्ली (भारत ) -विजेतेपद
2008 -निंगबो सिटी (चीन) -विजेतेपद
2010 -ब्रिजटाऊन (बार्बाडोस)- विजेतेपद
2018 -नवी दिल्ली ( भारत )-विजेतेपद


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
4 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)