#WWCHs2018 : सोनियाचे रौप्य पदकावर समाधान

नवी दिल्ली : मेरी कोमच्या विक्रमी सहाव्या सुवर्ण पदकानंतर सर्वांचे लक्ष 21 वर्षीय सोनिया चहलकडे होते. मात्र, 57 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात सोनियाचा जर्मनीच्या ऑर्नेला गॅब्रीला वाहनर हिने परभाव करत सुवर्णपदक पट्‌कावले. तर, सोनियाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. या सामन्यात पहिल्या फेरीपासूनच जर्मन खेळाडूचा दबदबा राहीला. आपल्या क्रमांक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या सोनियाला जर्मन खेळाडूने आक्रमकतेनेच प्रत्युत्तर दिले.

पहिली फेरी जर्मन महिला खेळाडूने गाजवली. दुसऱ्या फेरीच्या सुरुवातेला सोनियाने पुनरागमन करत आक्रमक खेळ केला. परंतु, पुन्हा जर्मन खेळाडूने आक्रमणाची धुरा संभाळल्यावर सोनियाने बचावात्मक पवित्रा स्वीकारला आणि तेथूनच तिच्या विजयाच्या आशा कमी झाल्या. दुसऱ्या फेरीच्या शेवटच्या काही सेकंदात जर्मन महिला खेळाडूने ठोशांचा सलग वर्षाव केला तेव्हा सोनिया थोडी बिथरली होती.

त्यानंतर दुसरी फेरी संपली. तिसऱ्या फेरीत काही चमत्कारिक कामगिरी करून सोनिया विजय मिळवेल अशी अपेक्षा घरचे प्रेक्षक करत होते. परंतु, तिसऱ्या फेरीतही जर्मन महिला खेळाडू वरचढ ठरली आणि तिने हा सामना जिंकत सुवर्णपदक पटकाविले. 21 वर्षीय सोनिया चहल जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत 57 किलो वजनी गटात आपले पहिलेवहिले सुवर्ण पदक जिंकण्यात अपयशी ठरली. तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)