विखेंची डोकेदुखी, कर्डिले कात्रीत, कार्यकर्ते संभ्रमात…

सेनापतीच्या भूमिकेवर उमेदवाराचे भवितव्य ठरणार 

रवींद्र कदम/नगर: नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्यात विजयासाठी घमासान सुरू असताना नगर तालुक्‍यातील व जिल्ह्यातील कर्डिले समर्थक कार्यकर्ते डॉ. विखेंच्या प्रचारात शांत असल्याने त्यांची डोकेदुखी वाढत चालली आहे. ऐकीकडे जावई व दुसरीकडे पक्ष, या कात्रीत राहुरी, पाथर्डी-नगर मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले सापडेले आहेत. त्यांची नेमकी भूमिका कार्यकर्त्यांना समजली नसल्याने त्यांच्यातही संभ्रम निर्माण झाला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीचे रण उन्हा प्रमाणेच तापले असून, लोकसभेची धामधूम जिल्ह्यात सुरू आहे. नगर दक्षिण मतदारसंघाचे भाजप-सेनेचे उमेदवार डॉ. विखे, तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार व भाजपचे आमदार कर्डिले यांचे जावई आमदार जगताप यांच्यात सरळ लढत होणार आहे.

नगर शहर, जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण व नगर-राहुरी मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार कर्डिले यांचे कट्टर समर्थक डॉ. विखे यांचा प्रचार न करता राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार व आमदार कर्डिले यांचे जावई जगताप यांच्या प्रचार रात्र-दिवस सैन्य घड्याळाच्या काट्याला चिकटल्याले दिसत आहे.

आमदार कर्डिले यांचा नगर दक्षिण मतदारसंघामधील तालुक्‍यात कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे. तसेच तालुक्‍यातील ग्रामपंचायत, सहकारी सेवा सोसायट्या, दूध संघ, खरेदी-विक्री संघ, नगर तालुका मार्केट कमिटीवर आमदार कर्डिलेंची पकड आहे. परंतु हे कार्यकर्ते डॉ. विखे यांचा प्रचार करताना कोठेच सक्रिय दिसत नसल्याने डॉ. विखेंची डोके दुखी वाढणार आहे.

आमदार कर्डिले यांचे निष्ठावंत कार्यकर्त्यांना कुठलाच आदेश आला नसल्याने कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. केंद्रात भाजप-सेनेची युती झाली आहे. परंतु गाव, तालुका पातळीवर श्रेयवादाची लढाईने मात्र जोर धरला आहे. त्यामुळे पक्षाच की जावई, नेमके काम कोणाचे करायचे, हाच विषय तालुक्‍यात चर्चेचा ठरत आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे पडसाद नगर दक्षिण मतदारसंघावर पडणार

शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपचे असणारे भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवल्याने सेनेचे उमेदवारा सदाशिवराव लोखंडे हे अडचणीत येण्याची शक्‍यता नाकरता येत नाही. भाऊसाहेब वाकचौरे हे राधाकृष्ण विखे पाटलांचे जवळचे मानले जाते. त्यांची उमेदवारी शिवसेनेसाठी अडचणीची ठरत आहे. त्याचे पडसात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पडणार आहेत. दक्षिणेतील शिवसेनेचे कार्यकर्ते ही संभ्रमात आहेत. आम्हाला नाही तर तुम्हाला खाऊ देणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली असून, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे पडसाद नगर दक्षिण मतदारसंघावर पडणार, हे मात्र नक्की.


जगतापांना लोकसभेत पाठवा- शीतल जगताप

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची कन्या व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांची पत्नी शीतल जगताप यांनी नुकतीच बुऱ्हाणनगर येथे प्रचार सभेत म्हटले आहे की माझ्या वडिलांचे काहीही ऐकू नका आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेत पाठावा, अशी भावणीक साद मतदारांना घालत आहेत. त्याचे पडसादही आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांवर व मतदारावर मोठ्या प्रमाणात पडत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)