ट्रक व कंटेनरच्या अपघातात दोनजण जखमी

संगमनेर – पुणे नाशिक महामार्गावर माहुली शिवारात शुक्रवारी ( दि.1) सकाळी साडेसातच्या सुमारास नाशिकहून पुण्याकडे जाणारा मालवाहू ट्रक दुभाजक ओलांडून कंटेनरवर आदळल्याने समोरा- समोर धडक बसून अपघात झाला. या अपघातात दोनजण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नाशिकहून पुण्याकडे भरधाव वेगाने जाणारा ट्रक एकल घाट पास करून पुढे गेल्यानंतर मोठा उतार असल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक माहुली गावाजवळ दुभाजक ओलांडून नाशिककडे जाणाऱ्या कंटेनरवर जोरात आदळला. या अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले. यात वाहक, आणि चालक यांना किरकोळ दुखापत झाली. जखमींवर आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)