छिंदमच्या विरोधात दाखल करणार ‘रिट ऑफ को वॉरंटो’

पीपल्स हेल्पलाइन : अधिकार नसताना मनपाच्या सभेत लावली होती हजेरी 

नगर – मनपाच्या 2 ऑगस्टच्या सर्वसाधरण सभेत पोलीस बंदोबस्तात हजर राहणाऱ्या भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम विरोधात पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने उच्च न्यायालयात रिट ऑफ को वॉरंटो दाखल केला जाणार असल्याची माहिती ऍड. कारभारी गवळी यांनी दिली. तर मोठ्या फौजफाट्यासह छिंदमला मनपाच्या सभागृहात हजर करणाऱ्या पोलीस प्रशासनाला जाब देण्याची वेळ येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल छिंदम याने आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. त्याचा उपमहापौर पदाचा राजीनामा घेण्यात आला. महासभेने त्याचे नगरसेवक पद रद्द केले. तर भाजपने देखील त्याला सोडचिठ्ठी दिली. तसेच पोलिसांनी त्याला अटक करुन हद्दपारीची कारवाई केली. तरी देखील श्रीपाद छिंदम महापालिकेच्या सभेत पोलीस बंदोबस्तात हजर झाला. संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्‍तव्याने मानवी मूल्य त्याने पायदळी तुडवले आहेत. पोलीस बंदोबस्तात महासभेत जाऊन संसदीय लोकशाही विरोधात कृत्य केले आहे.

अधिकार नसताना छिंदम पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या सभागृहात शिरला, त्या विरोधात रिट ऑफ को वॉरंटो उच्च न्यायालयात दाखल केले जाणार आहे. याला महापौर, आयुक्‍त व जिल्हा पोलीस अधीक्षकांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. बेकायदेशीर सत्ता काबीज करणाऱ्या विरोधात को वॉरंटो काढला जातो. समोरच्याने कोणत्या अधिकारात कृत्य केल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागते. समोरचा व्यक्ती दोषी आढळ्यास त्याला पन्नास लाख रुपये पर्यंतची दंडात्मक शिक्षेची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेचा ऍड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, प्रकाश थोरात, वीरबहादूर प्रजापती, महेमूद सय्यद, शाहीर कान्हू सुंबे यांनी निषेध नोंदवला आहे.

लोकशाहीचा भंग 

एका आरोपीला झेड सेक्‍युरिटीत मनपाच्या सभेत आणून लोकशाहीचा भंग केला आहे. याबाबत पोलिसांनी शहानिशा करुन, त्याला सभागृहात हजर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडून हुकूम आणणे गरजेचे होते. त्याला सभेत हजर करण्यासाठी पोलिसांनी सहकार्य केल्याचा आरोप ऍड. गवळी यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)