शिर्डीतील बहुचर्चित त्रिकोण घेणार मोकळा श्‍वास 

शिर्डी : येथील साई मंदिरालगतची त्रिकोणातील दुकाने व्यावसायकांनी स्वतःहून काढण्यास प्रारंभ केला. (छाया : राजकुमार जाधव)

45 दुकानदारांचा स्वत:हून अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय

शिर्डी – शहरातील मोफत सर्व्हेमधील त्रिकोणात असलेल्या 45 दुकानदारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करत स्वतःहून दुकाने काढण्यास सुरुवात केली आहे. जागेचा नगरपंचायतीच्या प्रतिनिधीद्वारे पंचनामा करून जागेचा कब्जा घ्यावा, अशा आशयाचे निवेदन दुकानदारांच्या वतीने मुख्याधिकारी सतीश दिघे यांना देण्यात आले.

-Ads-

बुधवारी रात्री येथील सर्व दुकानदारांनी या जागेत अनेक वर्षे व्यवसाय केला. त्यामुळे जागेचे ऋण फेडण्यासाठी यज्ञाचे आयोजन करून जागेचे पूजन केले. त्रिकोणातील 45 दुकाने 11 ऑगस्ट रोजी काढून टाकावे, दुकानदारांना पर्यायी जागा किंवा आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार ही दुकाने प्रशासनाने काढून टाकावी, असे आदेशात म्हटले होते. न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आदर करत या दुकानदारांनी गुरुवार सकाळपासून दुकाने स्वतःहून काढण्यास सुरुवात केली आहे.

साईबाबा मंदिर पासून जवळच असलेल्या मोफत सर्व्हे क्रमांक एक मध्ये त्रिकोणात 1965 साली दुकाने बसली होती. 1972 साली या जागेचा न्यायप्रविष्ट वाद सुरू झाला. 50 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर सुप्रीम कोर्टाने दुकाने काढण्याचा निकाल दिला. यापूर्वी याठिकाणी असलेली 56 दुकाने काढण्यात आली होती. दुकानदारांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले. यात म्हटले आहे की, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 56 दुकानदारांनी प्रशासनास नेहमी सहकार्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित दुकानदारांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने दुकानदारांना सहकार्य करावे, अशी मागणी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)