शेवगाव तहसीलवर मंगळवारी ‘धडक मोर्चा’ 

शेवगाव : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्ग आरक्षणात समावेश करावा, यासाठी निवेदन नायब मयूर बेरड यांना देताना धनगर समाज बांधव.

बैठकीतील निर्णय : धनगर समाजाची अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेशाची मागणी

शेवगाव – राज्य शासनाने धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्ग आरक्षणात समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी येत्या मंगळवारी (दि. 14) शेवगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा शेवगाव तालुका धनगर समाज बांधवाच्या वतीने देण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेवगाव येथे बुधवारी शासकीय विश्रामगृहात धनगर समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसील कार्यालायवर धडक मोर्चा नेण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर नायब तहसीलदार मयूर बेरड व पोलीस ठाण्याचे ठाणे अमंलदार धोत्रे यांना निवेदन देण्यात आले. ज्येष्ठ नेते जगन्नाथ गावडे, आत्माराम कुंडकर, प्राचार्य के. वाय. नजन, प्राचार्य डॉ. एल. के. मतकर, विनायक नजन, निवृत्ती दातीर, बापूराव राशिनकर, आप्पासाहेब देवढे, कृष्णा वाघमोडे, नगरसेवक भाऊसाहेब कोल्हे, गणेश कोरडे, शिवाजी तागड आदी प्रमुख उपस्थित होते.

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याची मागणी गेल्या 70 वर्षांपासून केली जात असूनही शासनाकडून आश्‍वसनापलिकडे काही मिळत नाही. प्रत्येक वेळी चालढकल केली जात असल्याने धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न अद्याप सुटला नाही. शासनाने धनगर समाज बांधवांच्या न्याय्य मागणीचा विचार करून त्वरित अनुसूचित जमाती (एस. टी.) प्रवर्गात समावेश करावा, अशा भावना अनेकांनी बैठकीत व्यक्‍त केल्या. नगर येथे सोमवारी (दि.13) धनगर समाज बांधवांचे धरणे आंदोलन आहे. या आंदोलनतही सहभागी होण्याचा निर्णय या वेळी झाला.

यावेळी लक्ष्मण देवढे, माणिक निर्मळ, बापूसाहेब तुतारे, शहादेव चितळकर, विजय डोईफोडे, शहादेव खोसे, संभाजी शिंदे, सोपान सासवडे, भगवान दातीर, आबासाहेब मिसाळ, लक्ष्मण भाकरे, विजय गावडे, बाबासाहेब रोडगे, पांडुरंग दातीर, अरूण मतकर, अजय नजन, सुनील शिंदे, महादेव तुतारे, दिलीप तुतारे, सुखदेव तुतारे आदींसह मोठ्या संख्येने धनगर समाजबांधव उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)