पाथर्डीतील “त्या’ चौघांना एक दिवसाची कोठडी

कामगाराने किराणा माल परस्पर विकल्याचे प्रकरण

पाथर्डी – दीड लाख रुपयांचा किराणा दुकानातील माल कामगाराने परस्पर काही दुकानदारांना विकल्याच्या घटनेतील चौघांच्या पोलीस कोठडीत एक दिवसांची वाढ करण्यात आली. यापूर्वी चौघांनाही चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती.

ही घटना शहरात सोमवारी सांयकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. चारही आरोपींना न्यायाधीशांनी चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची कोठडी न्यायालयाने सुनावली. पाथर्डी शहरात विकास उदबत्ते यांचे किराणा दुकान आहे. गेल्या सहा वर्षापासून अभिजीत प्रकाश नरवणे हा दुकानात कामगार होता. उदबत्ते यांचे किराण्याचे गोदाम नगरपालिका कार्यालयाच्या गेटसमोर आहे. अभिजीत नरवणे सोमवारी सांयकाळी सहा वाजता गोदामातून एका चारचाकी पिकअप गाडीमध्ये किराण्याच्या पिशव्या टाकताना विकास उदबत्ते यांनी पाहीला. नरवणे याने मालकाला पाहिल्यावर तो पळाला. पालिकेच्या गेटसमोर तो उभा होता.

विकास उदबत्ते यांनी पोलिसात फिर्याद दिली. सुमारे दीडलाख रुपयाचा किराणामाल विकल्याची तक्रार दाखल केली होती. अभिजीत नरवणे व त्याच्याकडून चोरीचा माल विकत घेणारे मनोज डोळस, योगेश काकडे, विष्णू तांबे, नागेश लोटके, अनिल बहीरट यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविली होती. अभिजीत नरवणे, मनोज डोळस, योगेश काकडे, विष्णू तांबे यांना तपासी अधिकारी अरविंद चव्हाण यांनी अटक केली होती. मंगळवारी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अस्मिता वानखडे यांच्यासमोर चार आरोपींना पोलिसांनी हजर केले होते. सरकारी पक्षाच्या वतीने ऍड. शिवाजी दराडे यांनी बाजू मांडली. पाच दिवसांची पोलीस कोठडी त्यांनी मागितली असता दहा ऑगस्टपर्यंत चार दिवसांची कोठडी मंजूर झाली होती. त्यानंतर आज पुन्हा त्या चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची कोठही सुनावण्यात आली.

नागेश लोटके व अनिल बहीरट चारचाकी वाहनासह फरार झाले आहेत. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अरविंद चव्हाण तपास करीत आहेत. पोलीस कॉन्स्टेबल संदीप गर्जे, प्रदीप बोरुडे तपास कामी मदत करत आहेत.

मोबाईलमुळे चोरीचा छडा…

अभिजीत नरवणे चोरी करतो, असा संशय विकास उदबत्ते यांना होता. उदबत्ते यांनी अभिजीतला नवीन मोबाईल हॅन्डसेट घेवून दिला. त्यामध्ये बोललेले सर्व रेकॉर्ड झाले. अचानक मालकाने फोनमधील संभाषण ऐकले व चोरीचा छडा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)