बारा दिवसांपासूनचा पाथर्डीतील ठिय्या स्थगित

पाथर्डी - येथे मराठा समाजाचे बारा दिवसांपासून आंदोलन सुरू होते.

आज शहरात चक्‍काजाम आंदोलन

पाथर्डी – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. मंगळवारी न्यायालयाने आरक्षणाबाबत केलेल्या सुनावणीवर विश्‍वास ठेवून दिलेल्या वेळेपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले.

-Ads-

दरम्यान, आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यावेळी आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभर आंदोलने सुरू आहे. पाथर्डी शहरातही वसंतराव नाईक चौकात सुमारे बारा दिवसांपासून सकल मराठा समाज बांधवाकडून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होते. दि. 9 ऑगस्ट रोजी पाथर्डी तालुक्‍यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तालुका बंदची हाक दिली असून शहरातील नाईक चौकात सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
दि.27 जुलैपासून आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव बेमुदत ठिय्या आंदोलन चालू आहे. आंदोलना दरम्यान कीर्तन, भजन, भक्‍तीगीते, व्याख्याने,प्रोबोधनपर पवाडे असे विविध कार्यक्रम आयोजित करून शांततेच्या मार्गाने बारा दिवस होत आहेत. उद्या सकाळी नाईक चौकात तालुक्‍यातील हजारो समाज बांधव चक्काजाम आंदोलनात सहभागी होणार आहेत.

उद्याच्या चक्काजाम आंदोलनानंतर बेमुदत ठिय्या आंदोलन मागे घेण्यात येणार आहे. आरक्षण मिळावे, यासह कोपर्डी घटनेतील आरोपीना तात्काळ फाशी द्यावी, मागावसर्गीय आयोगाचा अहवाल तात्काळ प्राप्त करून दिलेल्या वेळेत आरक्षणाचा निर्णय घ्यावा, प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह बांधावेत, आर्थिक विकास महामंडळाव्दारे समाज बांधवांना व्यवसायासाठी कर्ज द्यावे, ओबीसी शिष्ययुवृत्तीचा लाभ मिळावा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम लवकर पूर्ण करावे, गडकिल्ले संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देणे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)