विभागीय हॉकी स्पर्धेतही ‘गौतम’ला दुहेरी मुकूट

कोपरगाव – सोलापूर येथे झालेल्या विभागीय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या 14 वर्षांखालील व 17 वर्षांखालील हॉकी संघानी पुणे विभागात आपले वर्चस्व कायम राखले. या स्पर्धेच्या 14 वर्षांखालील गटात खेळताना गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात सोलापूर ग्रामीण या संघाचा 5-0 असा दारुण पराभव केला; तर अंतिम सामन्यात सोलापूर सिटी संघाचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला.

अंतिम सामन्यात गौतम पब्लिक स्कूलच्या हर्श काकडे व वैभव देसले या खेळाडूंनी निर्णायक गोल करत विजयी कामगिरी बजावली. याच स्पर्धेत खेळताना गौतमच्या 17 वर्षांखालील संघाने उपांत्य सामन्यात पी.सी.एम.सी. पिंप्री चिंचवड या संघाचा 5-0 गोल फरकाने धुव्वा उडवला. अंतिम सामन्यात पेनल्टी स्ट्रोकमध्ये आलेगावकर महाविद्यालयाच्या संघाचा 3-1 गोल फरकाने पराभव केला. अंतिम सामन्यात खेळताना गौतमच्या शुभम मोरे, ओम बडवर, यश खेमनर यांनी निर्णायक गोल केल. गोलरक्षक प्रतीक खडसे याने अभेद्य गोलरक्षण करत विजयात मोलाची कामगिरी बजावली.

-Ads-

गौतमचे हे दोन्ही संघ राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व सलग तेराव्या वर्षी करणार असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली. गौतमचा सब ज्युनियर नेहरू हॉकी संघ दिल्ली येथे 14 ऑक्‍टोबर 2018 पासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय नेहरु हॉकी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार आहे. 14 वर्षांखालील शालेय राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा नाशिक येथे, तर 17 वर्षांखालील शालेय राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा कोल्हापूर येथे होणार आहेत.

संपूर्ण स्पर्धेत रितेश पोळ, हर्शल शेवकर, ओम भाबड, संग्राम कहाटे, योगेष खेडकर, सागर खडसे, सुशांत बेडसे, कार्तिक पटारे, प्रमोद दरोडे, श्रीयोग भालेराव, विवके चऱ्हाटे, जनार्दन सापते, सुयश जगताप, तेजस सोनवणे, समर्थ गोंदकर, ओम वाघ, सार्थक पटारे, प्रणव गुरसळ, केतन निकम, घनशाम आहिरे, अनिकेत पवार, रोहन महाजन, तेजस बोरसे, अभिजीत उबाळे, अजय गायके, अर्जुन परांडे, अमित गांगुर्डे, अमित पाटील, सत्यम छानवाल, शुभम महाले यांनी नेत्रदीपक खेळ केला.

विजयी संघाला शेख, सुधाकर निलक, हॉकी कोच रमेश पटारे, सहायक हॉकी प्रशिक्षक कपील वाघ, संजय इटकर, राजदीप यादव, रिझवान पठाण, कन्हैया गंगुले, प्रणव नेगी, पर्यवेक्षक मीना शिंदे, ज्योती शेलार आदींचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आशुतोष काळे, उपाध्यक्ष छबुराव आव्हाड, सचिव चैताली काळे, सहसचिव स्नेहलता शिंदे आदींनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)