रस्ता लुट करणारी गुन्हेगारांची टोळी जेरबंद

राहुरी – तालुक्‍यातील रस्ता लुट करणाऱ्या गुन्हेगारांची टोळी जेरबंद करण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे. दि. 17 जानेवारी रोजी दाखल गुन्हयात मालुंजे खुर्द येथील काळ्या रंगाच्या विनानंबरच्या गाडीवरुन आलेल्या अज्ञात आरोपींनी फिर्यादीचा मोबाईल टॅब चोरला होता. संशयित आरोपी किरण बाळासाहेब गायकवाड (रा.आंबेडकरनग, मालुंजे खुर्द ता. राहुरी) यास ताब्यात घेवून त्याची चौकशी केली गेली.

त्याने गुन्हयाची कबुली दिली असून या गुन्हयातील अन्य आरोपींना अटक केली गेली. अटक केलेले आरोपी किरण बाळासाहेब गायकवाड (वय 21), गणेश विष्णू जाधव (वय 25 दोघेही रा. मालुंजे खुर्द, ता.राहुरी) रविंद्र रामभाउ बडे (वय 27) राहुरी , बाळासाहेब गायकवाड (वय 23 रा. भेर्डापुर ता. श्रीरामपूर) तर आरोपी किरण दत्तु शेलार (रा. भिल्ल वस्ती, मुसळवाडी), अविनाश जालिंदर माळी (वय 20 रा. कोपरे ता. राहुरी) असे फरार आहेत .

-Ads-

अटक आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली असून गुन्हयात चोरीस गेलेली रक्कम आपापसात वाटून घेतली आहे. तसेच गुन्हयात वापरलेली बजाज पल्सर, सॅमसंग कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 55, 700 रूपयांचा मुद्‌देमाल हस्तगत केला आहे .

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)