शालार्थ प्रणालीचे प्रस्ताव निकाली काढा- आ. डॉ. तांबे 

संगमेनर – आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी शासनाकडे सातत्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायम आग्रही भूमिका ठेवली आहे. दिंनाक 12 फेब्रुवारी रोजी पुणे येथे शिक्षण संचालक यांच्या समवेत झालेल्या बैठकीत नाशिक विभागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शालार्थ प्रणालीचे प्रलंबित प्रस्ताव त्वरीत निकाली काढावे, यासाठी आ. डॉ. सुधीर तांबे यांनी ही आग्रही मागणी केली आहे.

शिक्षण संचलनालया, पुणे यांच्या कार्यालयात महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षक व शाळांच्या विविध अडचणी व समस्यांबाबत सहविचार सभा झाली. यावेळी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर कानडे, शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, शाळीग्राम भिरुड, भारत घुले, डॉ.एन.डी.नांद्रे, डॉ.शांताराम पाटील व सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

या सभेतील माहितीनुसार शालार्थ प्रणालीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावापैकी ठाणे व नाशिक विभागातील प्रस्तावांची छाननी सुरु आहे. 12 फेब्रुवारी 2019 अखेर 481 कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव तपासण्यात आले असून फेब्रुवारी 2019 अखेर नाशिक विभागातील या प्रस्तावांमध्ये त्रुटी नाहीत अशा माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात येईल. त्रुटी असलेल्या प्रस्तावांबाबत संबधित शिक्षणाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविण्यात येईल.

याबाबत शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी माहिती दिली, राज्यात आढावा घेतला असता माध्यमिक व उच्च माध्यमिकस्तरावर जवळपास 1 हजार प्रस्ताव उपसंचालकस्तरावर जमा आहेत. प्रस्ताव संचालनालयस्तरावर जमा करण्यासाठी परवानगी मिळावी, याबाबत शिक्षण आयुक्तांशी चर्चा झाली असून प्रलंबित प्रस्ताव स्विकारणेसाठी लवकरच अध्यादेश काढण्यात येणार आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील वेतन अधीक्षकांचे पथक शालार्थ प्रस्ताव तपासणीसाठी कार्यरत असून दररोज जवळपास 100 प्रस्तावांची छाननी होत आहेत. परंतु यावर आ. डॉ. तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात अनेक शिक्षक वेतनापासून वंचित आहेत. शालार्थ प्रणालीचे प्रस्ताव निकाली काढण्याबाबत याअगोदरही बैठका घेण्यात आल्या. परंतु प्रत्येक वेळी केवळ तारखा देण्यात आल्या. त्यावर ठोस अशी कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. शिक्षण विभागाने त्रुटी नसलेले प्रस्ताव त्वरीत निकाली काढावे अशा सूचनाही आ.डॉ.तांबे यांनी दिल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)