कुकाणेत शिवजयंतीनिमित्त हॉलीबॉल स्पर्धा

नेवासे – नेवासे तालुक्‍यातील कुकाणे येथे शिवजयंतीनिमित्त दि.19 व 20 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय खुल्या हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.19) पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांच्या हस्ते तर पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांच्या अध्यक्षतेखाली अफजल शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

हिंदू-मुस्लीम ऐक्‍याचे दर्शन

कुकाणे येथील मुस्लीम समाजातील तरुण दरवर्षी शिवजयंती निमित्ताने हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करत असल्याने या परिसरात हिंदू-मुस्लीम ऐक्‍याचे दर्शन होते.

या स्पर्धेत विजेत्या संघास प्रथम पारितोषिक 15 हजार रुपये शहानवाज शेख यांच्याकडून दुसरे 11 हजार रुपये सचीन देसरडा, तृतीय 7 हजार रुपये विठ्ठलराव लंघे व विठ्ठल अभंग यांच्याकडून, चतुर्थ 5 हजार रुपये मच्छिंद्र म्हस्के व हरिभाऊ थोरे तर पाचवे 3 हजार रुपये साहेबराव खाटिक व सचिन साबळे यांच्याकडून ठेवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त अनेक वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी हनीफ शहा, मुसा इनामदार, योगेश वर्मा, अशोक मिसाळ, रामदास गोल्हार, संजय पवार, अजित मंडलिक, शरद गरड, राजेंद्र म्हस्के, अशोक दरवडे, बाळासाहेब म्हसरुप, युनुस शेख, खंडेराव सुकळकर, सादिक शेख, बाबासाहेब सोनवणे, जालिंदर कोठे, संपत मगर, लहू गुंड यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सलीम शहा, मतीन इनामदार, स्वप्नील माळवे, नारायण उगले, सादिक शहा यांनी केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)