बोल्हेगाव येथे 66 हजारांची घरफोडी

नगर – बोल्हेगाव येथे चोरांनी बंद घरातून 66 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. प्रतीक अरविंद कांबळे (वय 42) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदविला आहे.

प्रतीक कांबळे यांचे बंद घराचे कुलूप चोरांनी तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक केली. कपाटाचे लॉक उचकाटून चोरांनी त्यातील रोख रक्कम आणि दागिने चोरून नेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कांबळे हे घरी आल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)