पाथर्डी शहरात गुंडाराज ; शिक्षकाला बेदम मारहाण

पाथर्डी – पाथर्डी पोलिसांचा शहरातील गावगुंडांवर कुठलाही वचक राहिला नसून त्याचा गैरफायदा घेवून शेवगाव रस्त्यावरील चोरडिया कॉम्प्लेक्‍सच्या बाहेर खाजगी क्‍लास चालविणाऱ्या एका शिक्षकाला गाडीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शेवगाव रस्त्यावरील चोरडिया कॉम्लेक्‍समध्ये एक शिक्षक सातवी, आठवी, नववी या वर्गाचे इंग्रजी या विषयाचे क्‍लास घेतात. शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे हे शिक्षक क्‍लास झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता घरी जात असतांना चोरडिया कॉम्प्लेक्‍सच्या बाहेर लाल कलरच्या 4270 या नंबरच्या मोटारसायकलवरून आलेला एकजण व विना नंबरच्या बुलेट गाडीवरील एकजण अशा दोन अज्ञात तरुणांनी संबंधित शिक्षकाला लाथाबुक्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर ते दुचाकीवरून पळून गेले. याबाबत संबंधित शिक्षकाने पाथर्डी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात तरुणांनविरोधात मारहाणीचा गुन्हा रात्री उशिरा दाखल केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

झालेल्या घटनेचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून त्याच्या आधारे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अरविंद चव्हाण हे पुढील तपास करत आहेत. दरम्यान, शहरात किरकोळ कारणांवरून मारहाणीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांच्या दुर्लक्षामुळे गावगुंडांचे धाडस आणखी वाढत आहे. अशा गावगुंडांवर पोलिसांनी कारवाई करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)