पुलवामा शहिदांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बहिरोबावाडीत वृक्षारोपण

कर्जत – पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या शहीद सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कर्जतच्या सामाजिक वनीकरण विभागाकडून वृक्षारोपण करण्यात आले. सेवानिवृत्त सैनिक रमेश तोरडमल यांच्या हस्ते बहिरोबावाडी येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.

गुरुवारी पुलावामात अतिरेक्‍यांच्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले. सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल एन. एम. सिंगल यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बाहिरोबावाडी येथे लिंबु रोपांची लागवड करण्याचा उपक्रम राबविला. यावेळी वनक्षेत्रपाल एन.एम. सिंगल, महेश गांगर्डे, धनंजय निंबाळकर आदी उपस्थित होते. रोपांना काटेरी कुंपण घालण्यात आले असून, रोपांचे संगोपन करण्यात येणार असल्याचे रमेश तोरडमल म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)