लाखो भाविकांनी घेतले पैस खांबाचे दर्शन

नेवासे : येथील पैस खांबाचे दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांच्या गर्दीने मदिर परिसर फुलून गेला होता.

संत ज्ञानेश्‍वर मंदिर संस्थानकडून दिंड्यांचे स्वागत : जि. प. अध्यक्षा शालिनी विखेंच्या हस्ते अभिषेक

नेवासे – संत ज्ञानेश्‍वर महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीचे रचनास्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील पैस खांबाचे आषाढी वद्य भागवत एकादशीनिमित्त सुमारे लाखो भाविकांनी दर्शन घेतले. परिसरातील दिंड्यांचाही दिवसभर राबता असतो. संत ज्ञानेश्‍वर मंदिर संस्थानकडून दिंड्यांचे स्वागत करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येथे दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. पहाटेच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोषात माउलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबास व माउलींच्या मूर्तीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. यावेळी संत ज्ञानेश्‍वर मंदिर संस्थानचे प्रमुख गुरुवर्य शिवाजी देशमुख महाराज, संत तुकाराम महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख गुरुवर्य उद्धव मंडलिक, ऍड. माधवराव दरंदले, विश्‍वस्त ज्ञानेश्‍वर माउली शिंदे, कैलास जाधव, कृष्णा महाराज पिसोटे, प्रतीभा जाधव, समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, सागर गंधारे, डॉ. संजय सुकाळकर, शिवा राजगिरे, उपस्थित होते.

श्री क्षेत्र देवगड श्री दत्त मंदिर संस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज, आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख, पांडुरंग अभंग, भाजपचे युवा नेते नितीन उदमले यांनी भेट देऊन पैस खांबाचे दर्शन घेतले. नेवासे फाटा, नेवासे शहर ते माउली मंदिर हे रस्ते गर्दीने फुलून गेल्याने नेवासे शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. ज्ञानेश्‍वर मंदिर रस्त्यावर असलेल्या ज्ञानोदय इंग्लिश स्कूल प्रांगणात दुचाकी व चार चाकी पार्किंगसाठी वाहनतळ तैनात करण्यात आले होते.

संत तुकाराम महाराज मंदिर ते माऊली मंदिर अशा अंतरावर ठरलेल्या विविध दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी दिसून येत होती. पोलीस निरीक्षक डॉ.शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे व पोलीस, होमगार्ड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मंदिर प्रांगण ही गर्दीने फुलून गेले होते. दिवसभरात कानाकोपऱ्यातून आलेल्या दिंड्यांनी येथे हजेरी लावली. माउलींच्या रिंगण फुगडी खेळून एकादशीचा आनंद द्विगुणित केला.

अनेकांकडून खिचडी, केळी वाटप…

मंदिर प्रांगणात आमदार बाळासाहेब मुरकुटे मित्र मंडळ व पंचगंगा सिड्‌स कंपनीच्या वतीने वारकऱ्यांना शाबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. खिचडी वाटपाचा शुभारंभ गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते आमदार बाळासाहेब मुरकुटे व पंचगंगा सिड्‌स समूहाचे प्रमुख उद्योजक प्रभाकरराव शिंदे-ससे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. संत ज्ञानेश्‍वर मंदिर रस्त्यावर रानमळा येथील माउली ग्रुपच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले.उद्योजक रविराज तलवार व पूनम तलवार यांच्या वतीने पंधरा पोते शाबुदाणा खिचडीचे तर लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील पतसंस्था व मध्यमेश्‍वर बागवान यांच्या वतीने केळीचे वाटप करण्यात आले.

तीर्थक्षेत्र विकासाठी निधी देऊ -विखे

जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. पूजा झाल्यानंतर संस्थानच्या सभागृहात विखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विखे यांनी मंदिराच्या मागील बाजूस उभारलेल्या उद्यानाची पाहणी केली. येथील विकासकामाच्या प्रलंबित प्रश्‍नासाठी नगरपंचायत मार्फत नगरविकास खात्याकडे प्रस्ताव तयार करा, त्यासाठी आम्ही मदत करू व निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)