अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बडतर्फ 

नगर – अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेशाचा भंग होत असताना त्याची माहिती पक्षश्रेष्ठींना न दिल्याबद्दल अहमदनगर शहर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे.  पदावरुन काढून टाकण्यात येत असल्याचे तसे पत्र राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माणिकराव विधाते यांना दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वासह प्रदेश व जिल्हा नेतृत्वाने शिवसेना व भाजपबरोबर न जाण्याचे आदेश देऊन सुध्दा ते धुडकावून महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला. केवळ पाठिंबा देऊन थांबले नाही तर भाजपच्या महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारांना मतदान देखील केले होते.

पक्षाविरोधी घडामोडी होत असताना देखील जिल्हाध्यक्षानी पक्षश्रेष्ठींना याबाबतची माहिती अथवा कल्पना न दिली नव्हती. त्याबदल माणिकराव विधाते यांना 29 डिसेंबर 2018 रोजी नोटीस पक्षातर्फे देण्यात आली होती, मात्र नोटीसीबाबत अद्यापपर्यंत खुलासा न केल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाअध्यक्ष यांनी कारवाईबाबतचे पत्र देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना पदावरून बडतर्फ केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)