नगरमध्ये फोडाफोडीच्या ‘राजकारणा’ला वेग

राठोड, मुदगल राष्ट्रवादीत दाखल;  शिवसेनेला धक्‍क्‍यावर धक्‍के;  जाधव, बोरूडे मार्गावर

भोसले लवकरच राष्ट्रवादीत

मनसेचे नगरसेवक गणेश भोसले हे देखील लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी भोसले यांना भावी महापौर म्हणून समोर आणणार असल्याचे माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मोठा कार्यक्रम घेवून भोसले यांचा प्रवेश होणार असून त्या कार्यक्रमात महापौरपदाचा उमेदवार म्हणून भोसले यांचे नाव जाहीर केले जाणार असल्याचे समजते.

नगर – महापालिका निवडणुकीचे बिगुल वाचल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना आता वेग आला आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवस ठप्प असलेले फोडाफोडीचे राजकारण आता सुरू झाले असून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे कट्टर समर्थक व सर्वच पातळीवर मदत करणारे राजेंद्र राठोड यांच्यासह पत्ती नगरसेविका अनिता राठोड, सुनिता गुदगल यांनी शिवसेनेला रामराम करून आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे शिवसेनेला जोरदार धक्‍का बसला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, यापाठोपाठ नगरसेवक सचिन जाधव व सागर बोरूडे हे देखील शिवसेनेतून राष्ट्रवादीत जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शिवसेनेला धक्‍क्‍यावर धक्‍के बसणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता प्रभागनिहाय उमेदवार शोधण्याच्या मोहिमेला जोर येणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप व कॉंग्रेस या चार प्रमुख पक्षांकडे सध्या उमेदवारांचा वाणवा आहे. त्यामुळे उमेदवार मिळविण्यासाठी फोडाफोडीची राजकारण यापुढे मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्‍यता आहे.

आज मुंबईत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी राजेंद्र राठोड यांच्यासह अनिता राठोड, सुनिता मुदगल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी आमदार संग्राम जगताप, पक्षाचे उपाध्यक्ष कुमार वाकळे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष सुरेश बनसोडे, पोपटराव बारस्कर, सारंग पंधाडे, रणजितसिंह परदेशी, दिलदारसिंग बीर आदी उपस्थित होते.
अनिल राठोड यांना राजेंद्र राठोड यांची सर्वपातळी मदत होत होती.

आता राजेंद्र यांच्या पक्ष सोडल्याने शिवसेना अडचणीत सापडली आहे. यावेळी बोलतांना राजेंद्र म्हणाले, अनिल राठोड यांनी कार्यकर्त्यांचा स्वार्थासाठी वापर केला आहे. काम झाले की या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिले. त्यामुळे आज अनेक कार्यकर्ते शिवसेनेपासून दूर जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राठोड, मुदगल यांच्यापाठोपाठ आता सचिन जाधव, सागर बोरूडे हे शिवसेनेचे विद्यमान दोन नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. त्यांचाही लवकरच प्रवेश होण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)