बॉलिवूडमध्ये लवकरच अहान शेट्टीची एन्ट्री 

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान याने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलीवूडमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज झाला आहे. सुनील शेट्टीची मुलगी अथियाने “हीरो’ चित्रपटातून आपल्या करिअरची शुरूआत केली असून तिचे आतापर्यत तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आता त्याचा मुलगाही बॉलिवूडमध्ये आपले नशिब झळकावू पाहत आहे.

अहानला बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक साजिद नाडियादवाला लॉच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अहान “आरएक्‍स-100′ या तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथरिया करणार आहे.

या चित्रपटाचे अधिकार नुकतेच साजिद यांनी विकत घेतले आहेत. “वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, “द डर्टी पिक्‍चर’, “बादशाहो’ यासारख्या चित्रपटांचे मिलन लुथरिया यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचा लवकरच शुभारंभ करण्यात येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा तेलुगू चित्रपट तरुणवर्गात फार लोकप्रिय असून तरुणाईला त्याचा हिंदी रिमेकसुद्धा आकर्षित करणार अशी आशा असल्याचे साजिद म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1013 :thumbsup:
132 :heart:
101 :joy:
108 :heart_eyes:
114 :blush:
106 :cry:
104 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)