कृषी पदवी प्रवेशप्रक्रिया आजपासून

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 10 जुलैपर्यंत मुदत
प्रवेशासाठी संकेतस्थळ : www.mcaer.org

पुणे  – राज्यातील कृषी महाविद्यालयांतील कृषी पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमांतील प्रवेश प्रक्रिया शनिवार (दि.29)पासून सुरू होत आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 10 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावर प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

राज्यातील चार कृषी विद्यापीठांमधील कृषी, उद्यानविद्या, वनविद्या, मत्स्यविज्ञान, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, सामुदायिक विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे. एकूण 11 हजार 730 जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया होत आहे. तांत्रिक अडचणींमुळे राज्य सीईटी सेलने पूर्वीचे वेळापत्रक रद्द केले आहे. त्यानंतर शुक्रवारी सुधारित वेळापत्रक जाहीर केले.कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी दि. 29 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येईल. कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे व अर्ज सादर करण्यासाठी दि. 10 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दि. 15 जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. दि. 16 ते 20 जुलैदरम्यान ऑनलाइन हरकती घेतल्यानंतर दि. 26 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

कृषी पदवी प्रवेशाचे वेळापत्रक 

अंतिम गुणवत्ता यादी : 26 जुलै
पहिली प्रवेश फेरीची निवड यादी : 28 जुलै
दुसऱ्या प्रवेश फेरीची निवड यादी : 6 ऑगस्ट
तिसऱ्या प्रवेश फेरीची निवड यादी : 12 ऑगस्ट
चौथ्या प्रवेश फेरीची निवड यादी : 19 ऑगस्ट

अर्ज करण्याची मुदत :
29 जून ते 10 जुलै
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत : 10 जुलै
तात्पुरती गुणवत्ता यादी : 15 जुलै
यादीवर आक्षेप स्वीकारणे : 16 ते 20 जुलै

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here