राज्याच्या विकासात शेतीचा मोलाचा वाटा : कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत

कोल्हापूर – राज्य शासनाने शेती आणि शेतकऱ्यांच्या हितास सर्वोच्च प्राधान्य दिले असून राज्याच्या विकासात कृषि विभागाचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोद्‌गार कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

शेट्टींमध्ये हिम्मत राहिली नाही
साखर कारखानदारांच्या दारात जाऊन आंदोलन करण्याची हिंमत खासदार राजू शेट्टी यांच्यात राहिली नाही. दगड मारुन ब्रेकिंग न्यूज करण्यापलिकडे शेट्टींच्या संघटनेत हिंमत नसल्याचे सदाभाउ खोत यांनी म्हटले आहे. अमित शाह आणि मंत्र्यांना अडवायला मोगलाई नाही. वेळ पडल्यास “इट का जवाब पथ्थर से’ देऊ असा प्रति इशारा त्यांनी शेट्टी यांना दिला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांचा संघर्ष आणखी वाढणार आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणूक लढवली तर हातकणंगले मतदार संघातूनच लढवणार, असे पुन्हा एकदा खोत यांनी बोलून दाखवले.

कोल्हापूर येथील पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित तरंग राज्यस्तरीय कृषि कला-क्रिडा महोत्सवाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त सचिन्द्र प्रतापसिंह, निविष्ठा व गुणनियंत्रणचे संचालक विजयकुमार इंगळे, राष्ट्रकुल कुस्ती सुवर्णपदक विजेते राम सारंग व भारतीय कबड्डी संघाचे तुषार पाटील उपस्थित होते.
सदाभाऊ खोत म्हणाले, कृषि विभागांतर्गत कार्यरत कर्मचारी कल्याण निधीसाठी शासन सकात्मक असून अधिकारी-कर्मचाऱ्याच्या अडीअडचणी आणि प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविले जातील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कृषि क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात कृषि कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या तात्काळ निराकरणासाठी कृषि विभाग सज्ज आणि सजग असल्याचेही ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)