करारनामा करताना…

बांधकाम करताना अनेक अडचणी येतात. त्या प्रत्येक अडचणींबद्दल माहिती घ्यायला हव्यात. खरेदीपासून ते पूर्ण बांधकाम होईपर्यंत ज्या काही अडचणी येतात, त्यांची माहिती असणं आवश्‍यक असतं. करारनामा करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्‍यक ठरतं.

-बांधकाम करारनामा करताना बांधकामाचे क्षेत्रफळ त्यामध्ये नमूद केलेले असावे.
– बांधकामाचा दर त्यामध्ये समाविष्ट असला पाहिजे. तसेच दरामध्ये जर वाढ करायची असेल तर ती कोणत्या पद्धतीने करायची व केव्हा करायची यासंबंधी निश्‍चित मार्गदर्शनपर कलमे.
– बांधकामाची मुदत, मुदतवाढीची पद्धत याबद्दलची माहिती.
– बांधकाम मुदतीत पूर्ण न झाल्यास करण्यात येणारी कारवाई.
– बांधकामाचा दर्जा, बांधकामाच्या साहित्याचा दर्जा यासंबंधीची कलमे करारनाम्यात असणे आवश्‍यक आहे.
– बांधकामास विलंब झाल्याने पेनल्टी लावायची असल्यास त्यासंबंधी कलमे.
– बांधकामाचे पैसे अदा करण्याच्या पद्धती व त्यांचा तपशील.
– आवश्‍यक ते परवाने, पाणीव्यवस्था, सामान ठेवण्याबाबतची व्यवस्था इ. सर्व गोष्टींचा उहापोह या करारनाम्यात आला पाहिजे.
– करारनामा रद्द करण्याच्या पद्धती, कोणत्या कारणास्तव करारनामा रद्द करता येईल यासंबंधीच्या अटी शर्ती.
– करारनामा रद्द झाल्यास पैसे जमा करण्याविषयीच्या अटी व शर्ती.
– लवादाचे कलम उभय पक्षकारांना आवश्‍यक वाटले तर घालणे.
– व्यक्‍तिगत सभासदांचे सहकार्य, त्यांच्याविषयीच्या अटी व शर्ती.
– प्रत्येक सदनिकेत कोणत्या सुखसोयी करुन देणार याची यादी. ती यादी सदनिकेबरहुकूम असावी.
– याशिवाय अन्य काही सुविधा बांधकाम कंत्राटदार देणार असेल तर त्याचादेखील उल्लेख आला पाहिजे. उदा. सोसायटीच्या कार्यालयाला एखादी खोली बांधून देणार असेल तर, एखादी पंप रूम बांधून देणार असेल तर, कंपाऊंड वॉल बांधून देणार असेल तर इ.
– याप्रमाणे करारनामा साक्षीदारांसमक्ष सह्या करून घेणे आवश्‍यक आहे.
– शक्‍यतो अशा प्रकारचा करारनामा काम झाल्यानंतर रद्दबातल ठरतो. त्यामुळे पुष्कळजण तो रजिस्टर करीत नाहीत. परंतु थोडा खर्च आला तरी हरकत नाही, पण अशा प्रकारचा करारनामा रजिस्टर करून घेणे इष्ट होय.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)