हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणातील एजंटाला अटक

नवी दिल्ली – ऑगस्ता वेस्टलॅंड विमान कंपनीच्या 3600 कोटी रूपयांच्या हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणातील संरक्षण व्यवहाराचा एजंट सुरेश मोहन गुप्ता याला ईडीने आज अटक केली. त्याच्यावर मनि लांड्रिंग कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून याच कलमांअंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे असे ईडीने म्हटले आहे. या प्रकरणात त्याने एजंट म्हणून काम केले होते. अनेक संरक्षण व्यवहारात तो एजंट होता.

या प्रकरणातील माफीचा साक्षीदार राजीव सक्‍सेना याने दिलेल्या माहितीनुसार गुप्ताला अटक करण्यात आली. या प्रकरणात तो कसा गुंतलेला होता याचा सारा तपशील सक्‍सेना याने दिला आहे. ऑगस्ता वेस्टलॅंड कंपनीच्या हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणातील पेमेंटचे तपशील त्याच्याकडे मिळू शकतात असे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हेलिकॉप्टर व्यवहारात लाच दिली गेली असल्याचे निदर्शनाला आल्यानंतर युपीए सरकारनेच 1 जानेवारी 2014 रोजी हा व्यवहार रद्द केला आहे. या प्रकरणात माजी हवाईदल प्रमुख एसपी त्यागी आणि त्यांचे कुटुंबिय दोषी असल्याने त्यांच्या विरोधात सीबीआय आणि ईडीने अनेक आरोपपत्रे दाखल केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)