हॉंगकॉंगमध्ये प्रत्यार्पण विधेयका विरोधात पुन्हा एकदा बंद

हॉंगकॉंग – हॉंगकॉंग येथील प्रत्यार्पण विधेयक कायद्यात बदल करुन धार्मिक किंवा राजकीय आरोप असणाऱ्या व्यक्तींचे चीनला प्रत्यार्पण करण्यात यावे यासाठी तयार करण्यात आलेल्या नविन प्रत्यार्पण कायद्याच्या विरोधात हॉंगकॉंग येथे पुन्हा एकदा एकदिवसीय बंद पुकारण्यात येणार असल्याची घोषणा स्थानिक व्यवसायीकांनी केली आहे.
यापुर्वी 9 तारखेला येथील नागरीकांनी या विधेयकास विरोध दर्शवण्यासाठी मोर्चा काढला होता. त्या मोर्चामध्ये व्यावसायिकांपासून ते वकील, विदयार्थी, लोकशाहीला पाठिंबा देणारे कार्यकर्ते आणि धार्मिक गट सामील झाले होते.

अनेकांच्या हातामध्ये ”दुष्ट कायदा रद्द करा” आणि ”चीनमध्ये प्रत्यापर्णाचा निषेध” अशा आशयाचे फलक होते.
यावेळी संशयित गुन्हेगारांवर खटला चालवण्यासाठी त्यांना चीनच्या मुख्य भूमीमध्ये पाठवणे या वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकामुळे शक्‍य होणार असुन त्यामुळे हॉंगकॉंगच्या कायदा आणि सुव्यस्थे मध्ये चिनचा हस्तक्षेप वाढण्याची मोठी भिती या नागरिकांनी व्यक्त करत हा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये दहा लाख लोकांनी सहभाग घेतल्याचे आयोजकांचे म्हणणे होते. तर, पोलिसांच्या म्हणन्या नुसार या मोर्चात 2,40,000 लोकसहभागी झाली होती.

दरम्यान, सुरूवातीला शांततेत होणारा हा मोर्चा संपल्यानंतर शेकडो आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये संघर्ष झाला. सर्जिकल मास्क घातलेल्या काही आंदोलकांनी बॅरिकेड्‌सची नासधूस करत विधीमंडळात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना अडवण्यासाठी सज्ज पोलिसांनी लाठ्या आणि पेपर स्प्रेचा वापर आंदोलकांवर केला होता. यावेळी झालेल्या संघर्षात काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारीही रक्तबंबाळ झाल्याची माहिती स्थानिक पोलिस प्रशासनाने दिली आहे.

या विषयी बोलताना हॉंगकॉंगच्या सरकारने सांगितले की, प्रत्यार्पणासाठीच्या या मागण्यांना परवानगी द्यायची की नाही याविषयचा अंतिम निर्णय हॉंगकॉंगमधील कोर्टाचा असेल असे सरकारच्या प्रवक्‍त्यांनी म्हटले आहे. शिवाय राजकीय आणि धार्मिक गुन्ह्यांचे आरोप असणाऱ्यांचे प्रत्यार्पण करण्यात येणार नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)