गौतम गंभीरच्या विरोधात गुन्हा विना परवाना रॅली घेतली

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे पुर्व दिल्ली मतदार संघातील उमेदवार गौतम गंभीर यांनी जंगपुरा भागात विना परवाना रॅली घेतल्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचा आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिला आहे. गौतम गंभीर यांनी तेथे गुरूवारी रात्री ही रॅली घेतली होती. त्यांच्या विरोधात या प्रकरणी स्थानिक कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

या मतदार संघातील आम आदमी पक्षाच्या उमेदवार अतिशी यांनी त्यांच्या विरोधात दोन ठिकाणी वोटर आयडी असल्याच्या प्रकरणातही तक्रार दाखल केली असून त्यामुळे गंभीर यांची अडचण वाढली आहे. माजी क्रिकेटपटू असलेले गंभीर यांनी अलिकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश करून लोकसभेचे तिकीट मिळवले आहे. त्यांना या मतदार संघात आम आदमी पक्षाच्या उमेदवाराशी कडवी लढत द्यावी लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)