अफझल गुरु आणि मकबूल भटचे अवशेष कुटुंबीयांना द्यावेत

पीडीपी खासदाराची पंतप्रधानांकडे मागणी

श्रीनगर : संसदेवरील हल्ल्यातील दोषी दहशतवादी अफझल गुरु आणि जम्मू काश्‍मीर लिबरेशन फ्रंटचा संस्थापक मोहम्मद मकबूल भट यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात यावेत, अशी मागणी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे राज्यसभेतील खासदार मोहम्मद फैयाझ मीर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. या दोघांचेही मृतदेह परत दिल्यास काश्‍मिरींमधील दुरावलेपणा कमी होईल, अशी आपल्याला खात्री असल्याचे मीर यांनी पंतप्रधानांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.

मयत झालेल्या दोन काश्‍मिरींच्या मृतदेहांकडून भारतासारख्या लोकशाही देशाला काय धोका आहे ?माजी पंतप्रधानांच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेतून सूट दिली गेली आहे. त्यामुळे गुरु आणि भट यांच्या मृतदेहांना परत देण्याची मागणी करणे काहीही गैर नाही, असेही मीर यांनी म्हटले आहे.

संसद हल्ल्यातील दोषी दहशतवादी अफझल गुरु याला 9 फेब्रुवारी 2013 रोजी फाशी दिले गेले आणि तिहार कारागृहातच त्याला दफन केले गेले. गुप्तचर अधिकाऱ्याच्या हत्येत दोषी ठरलेल्या मकबूल भटला 11 फेब्रुवारी 1984 रोजी तिहार कारागृहात फाशी दिले गेले आणि कारागृहाच्या आवारातच त्याला दफन केले गेले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)