बिश्केक- किरगीझस्तानची राजधानी बिश्केक इथे आज शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात एक बैठक पार पडली आहे. या बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर एकमत झाल्याचे भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले.
परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, शी जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत भेटीच्या निमंत्रणाचा स्वीकार केला असून ते या वर्षामध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत.
Foreign Secy,Vijay Gokhale in Bishkek: PM specifically conveyed to Pres Jinping&he agreed that both sides need to raise our expectations from the relationship. PM welcomed him to India for next informal summit, President Xi Jinping confirmed his readiness to visit India this year pic.twitter.com/JuzQZUuKZs
— ANI (@ANI) June 13, 2019