खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ओवेसींचा ‘जय भीम’चा नारा

नवी दिल्ली – कालपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली असून नवनिर्वाचित सदस्यांनी खासदारकीची शपथ घ्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन (एमआयएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आज खासदारकीची शपथ घेतली.

असदुद्दीन ओवेसी यांनी उर्दू भाषेत शपथ घेतली. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी जय भीम म्हणत शपथेचा शेवट केला. असदुद्दीन ओवेसी शपथ घेण्यासाठी जात असताना सत्ताधाऱ्यांनी ‘जय श्री राम’ आणि  ‘भारत माता की जय’ अशी घोणषाबाजी देखील केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here