मंत्रिपद आल्यानंतर महादेव जानकरांनी जनतेला लाथ मारली; दशरथ राऊत यांची कोल्हापूरात टीका

कोल्हापूर: सत्ता आणि मंत्रिपद आल्यानंतर सर्वसामान्य जनतेला मंत्री महादेव जानकर यांनी लाथ मारली. त्यामुळेच त्यांना निरोप देऊन आपण भारतीय प्रजा सुराज्य पक्षाची स्थापना केल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ आबा राऊत यांनी सांगितले आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिवाय भारतीय प्रजा सुराज्य पक्षाकडून प्रजा जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी म्हंटले आहे.

महादेव जानकार यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला निरोप दिलेले दशरथ राऊत यांनी भारतीय प्रजा सुराज्य या पक्षाची स्थापना केली आहे. या पक्षामार्फत कोल्हापूर ते नागपूर अशा प्रजा जागर यात्रेची कोल्हापूर येथून सुरुवात झाली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या 48 जागांवर सुराज्य पक्ष हा उमेदवार उभा करणार असून विरोधक आणि सत्ताधारी या दोघांविरोधात आपली लढाई असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विशेष म्हणजे प्रजा सुराज्य पक्षांमध्ये सगळ्या जाती-धर्माच्या नागरिकांना स्थान दिले जाणार असून 20 जिल्ह्यांमधून प्रवास करून ही प्रजा जागर यात्रा नागपूरमध्ये पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत भारतीय प्रजा सुराज्य पक्ष प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)