सायंकाळचा विरंगुळा; खेळणी ,खाद्यपदार्थाची रेलचेल
नगर: उन्हाळ्ची सुट्टी ऐन मध्यावर आली असतांना आणि दुपारभर उष्म्याने अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यावर मात करण्यासाठी बाळगोपाळ आणि त्यांचे पालकजवळच्या उद्यानात जमू लागल्याचे चित्र पहायला मिळतय, या बाळगोपाळांच्या गर्दीने शहरातील सर्व बागा ,विरंगुळास्थाने गर्दीने फुलायला लागली आहेत. बाळगोपाळ घसरगुंडी,झोक्यावर बसून खेळण्यात दंग तर त्यांचे पालक संध्याकाळचा गारवा अंगावर घेत गप्पा मारण्यात गुंग होतांनाचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
नगर शहरात प्रत्येक प्रभागात असलेली छोटीमोठी विरूगुळास्थाने धरून जवळपास 52 बागा आहेत त्या पैकी तीन मोठी उद्याने म्हणजे शहराच्या मध्यवस्तीतील सिद्धीबाग ,सावेडी उपनगरातील गंगा उद्यान आणि भुतकर वाडी जवळील महालक्ष्मी उद्यान यातीन मोठ्या बागा आहेत. बाकीची छोटी -छोटी विरंगुळास्थाने जिथे मनपाच्या वतीने काही खेळणी बसविण्यात आली आहेत. ही सर्व विरंग़ुळा स्थाने हल्ली गजबजलेली दिसू लागली आहेत.
सिद्धीबागेत्तील खेळण्यांची अवस्था फारशी चांगली नसली तरी तेथे शहरातील मध्यवस्तीतील बाळगोपाळांची गर्दी असते. तेथे फुलराणी ची चक्कर मारता येते. तसेच तेथे घोड्यावरूनही रपेट करता येत असल्याने खेळण्यांकडे कोणाचेही विशेष लक्ष जात नाही . शिवाय शहराच्या मध्यवस्तीत असल्याने वाहनांची गरज भासत नाही.
उपनगरातील भुतकरवाडी जवळील महालक्ष्मी उद्यानही बाळगोपाळांच्या गर्दीने फुलून गेलेले दिसते.येथेही घसरगुंडी ,झोके, फिरती खेळणी असल्याने बालगोपाळ येथेही चांगली रमतात शिवाय येथे सेल्फी पॉईंट तयार केला असल्याने तेथे फोटो काढण्यासाठीही गर्दी असते. शिवाय येथील ड्रॅगन ट्रेन ,जंपिंग जॅक ही खेळणी बाळगोपाळांना आकर्षित करत असतात.
निरंकारी मिशनजवळील गंगा उद्यानातही सायंकाळच्यावेळी चांगलीच गर्दी जमते. येथील कारंजी विशेषतः मुलांना आकर्षित करतार तर येथेही बाळगोपाळांना आकर्षित करणारी सर्व खेळणी आहेत शिवाय सायंकाळच्या गारव्यात बसण्यासाठी तसेच कारंज्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी ऐसपैस लॉन असल्याने संध्याकाळ कशी पटकन सरते हे लक्षातही येत नाही.
उद्यानाच्या विकासासाठीच
महालक्ष्मी उद्यानात लजान मुलांसाठी 3 रुपये तर मोठ्यांसाठी 5 रुपये तिकीट असल्याने सुट्टीच्या दिवसात दररोज 1000 ते 2000रुपयांपर्यंत तिकीट विक्री होत असल्याचे समजते हासर्व पैसा मनपाच्या उद्यान विभागाच्या वतीने उद्यानाच्या विलासासाठीच वापरला जात असल्याचे उद्यान निरिक्षकांनी सांगितले.
सुट्टीच्या दिवसात धंदा तिप्पट
उद्यान म्हटलकी तेथे खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांची रेलचेल आलीच सुट्टीतील गर्दी त्यांच्या पथ्यावर पडतांना दिसते भेळ ,पाणीपुरी आणि तत्सम पदार्थांना तसेच कुल्फी सारख्या थंड पदार्थांना याठिकाणी मोठी मागणी असते. एरव्हीच्या तुलनेत सुट्टीच्या दिवसात तीन ते चार पटींनी धंदा वाढत असल्याचे फेरी वाल्यांनी सांगितले.