रियाध: हौथी गनिमांनी सौदी अरेबियाच्या एका महत्वाच्या तेल पाईप लाईनवर ड्रोन हल्ला करून त्याची मोठी मोडतोड केली होती. पण ती पाईप लाईन आता दुरूस्त करण्यात आली असून त्यातील तेलाचे सुरळीत वहन सुरू झाले आहे अशी माहिती त्या देशाच्या सरकारच्यावतीने देण्यात आली आहे. ज्या पाईपलाईनवर हा हल्ला झाला होता त्याला ईस्टवेस्ट पाईप लाईन या नावाने ओळखले जाते.
र्अमॅको कंपनीतफे ती चालवली जाते. त्यांनी आता ही पाईप लाईन पुर्ववत कार्यरत झाली आहे असे म्हटले आहे. या पाईप लाईनद्वारे दर दिवशी पाच दशलक्ष बॅरल इतके कच्चे तेल वाहून नेले जाते. तेल उत्पादन करणाऱ्या विहीरींमधून थेट समुद्रकिनाऱ्यावरील तेल टॅंकरपर्यंत तिचा विस्तार आहे. तेलाच्या निर्यातीत या पाईप लाईनचे महत्व मोठे आहे.