डॉलनंतर आता तैमूर नावाचा चित्रपट

बॉलीवूडमधील नवाब सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा लाडका मुलगा तैमूर अली खान हा सोशल मीडियावरील स्टार किड्‌स आहे. तैमूर आपल्या आई-वडिलांपेक्षाही जास्त पॉपुलर झाला आहे. काही दिवसांपूर्वीच बाजारपेठेत तैमूर डॉलने चांगलीच प्रसिद्धी मिळविली होती. त्यानंतर आता तैमूरच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी आहे.
चित्रपट निर्माता मधुर भांडारकर यांनी आपल्या आगामी चित्रपटाचे नाव “तैमूर’ असे ठेवले असल्याचे समजते. त्यामुळे प्रेक्षकांना लवकरच “तैमूर’ नावाचा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.

जेव्हा सैफ आणि करिनाने आपल्या मुलाचे नाव तैमूर असे ठेवले होते, तेव्हा सोशल मीडियावर खूपच हंगामा झाला होता. सैफ आणि करिनाला अनेकांनी ट्रोल केले होते. पण जस-जसा तैमूर मोठा होत गेला, तश-तशी त्याची लोकप्रियता वाढतच गेली आहे. तैमूरच्या क्‍यूटनेसवर संपूर्ण देश फिदा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तैमूरच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच येतो की, अजय देवगन याने तैमूरला इंडस्ट्रीमधील सर्वाधिक फेमस खान असल्याचे म्हटले होते. तसेच रणवीर सिंहही चित्रपटात तैमूरच्या वडिलांची भूमिका साकारु इच्छित आहे. याशिवाय याहूने प्रसिद्ध केलेल्या सर्वाधिक लोकप्रिय भारतीयांच्या टॉप-10मध्ये छोटा तैमूरचेही नाव आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)