पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्याची मोठी कामगिरी  

नवी दिल्ली: १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती. दरम्यान या हल्ल्यात सामील असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या जवळपास सर्वच दहशतवाद्यांना पुसून टाकले असल्याचे, लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लों यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या कारवाईत आतापर्यंत 41 दहशतवादी ठार केले असून, त्यातील जैश-ए-मोहम्मदचे 25 दहशतवादी होते. तर, यामध्ये 13 पाकिस्तानी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावर्षी आतापर्यंत 69 दहशतवादी ठार केले असल्याचे ढिल्लों यांनी म्हंटले आहे.

केजेएस ढिल्लों म्हणाले की, सैन्याच्या या कारवाईनंतर जैश-ए-मोहम्मदचा कमांडर बनण्यासाठी एकही दहशतवादी तयार होत नसल्याने, त्यांच्या मध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://twitter.com/ANI/status/1121006237188001793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)