चार महिन्यांनंतर पर्रिकर सचिवालयात

पणजी: सध्या प्रकृती अस्वास्थ्यतेमुळे घरूनच राज्यकारभार करणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी सचिवालयातील आपल्या कार्यालयात आले होते. सुमारे चार महिन्यांनंतर ते आपल्या कार्यालयात आले होते. या आधी ते ऑगस्ट महिन्यात कार्यलयात आले होते त्यानंतर त्यांच्यावर दिल्ली, मुंबई, अमेरिका इत्यादी ठिकाणी उपचार सुरू होंते.

आज सकाळी पावणे अकरा वाजता ते वैद्यकीय मदतीसह सचिवालयात आले आणि त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले. भाजप आमदारांनी त्यांचे तेथे स्वागत केले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांशीही त्यांनी तेथे चर्चा केली. गेल्या महिन्यात त्यांनी मांडवी नदीवरील पुलाची तेथे जाऊन पहाणी केली होती. पण त्यांचे प्रत्यक्ष लोकदर्शन असे आज पहिल्यांदाच झाले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)