ऊस दराची कोंडी फुटल्याने कोल्हापुरातील आंदोलन मागे 

कोल्हापूर  – गळीत हंगामात एफआरपीची रक्कम, पहिली उचल म्हणून एकरकमी देण्याबाबत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये एकमत झाल्याने अखेर ऊस दराची कोंडी फुटली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात होणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन देखील मागे घेण्यात आले आहे. मात्र राज्यात इतर ठिकाणी आणि विशेषत: सांगली जिल्ह्यामध्ये होणाऱ्या आंदोलनावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम असल्याचे सांगण्यात आले आहे.

यावर्षीच्या गळीत हंगामात पहिली उचल एफआरपी अधिक 200 रुपये देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. मात्र बाजारातील साखरेचे दर पाहता ऊसाला एफआरपी देणेही कठीण असल्याने साखर कारखानदारांनी कारखाने बंद ठेवले होते. त्यामुळे ऊसदाराची कोंडी निर्माण झाल्याने, यातून मार्ग काढण्यासाठी आज साखर कारखानदारांची बैठक झाली.

-Ads-

शेतकरी संघटनांनी केलेली मागणी, म्हणजे अवाजवी आहे. साखरेच्या दरात मोठी घसरण झाल्याने कारखाने अडचणीत आहेत. त्यामुळे एफआरपी अधिक 200 रुपये देणे कारखान्यांना शक्‍य होणार नाही. मात्र कायद्याने एफआरपी देणे बंधनकारक असल्याने, पहिली उचल म्हणून एफआरपीची रक्कम एकरक्कमी देण्याचा निर्णय साखर कारखानदरांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)