युक्रेनमध्ये लष्करी दारूगोळा कोठारांत स्फोटानंतर 12,000 जणांचे स्थलांतर 

संग्रहित छायाचित्र

इंचिया (युक्रेन): युक्रेनच्या इच्नीय येथील लष्करी दारूगोळा कोठारांना लागलेल्या आगीनंतर जवळपासच्या 38 गावांमधील 10,000 पेक्षा अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. राजधानी कीव पासून सुमारे 100 किमी अंतरावरील इच्नीय येथील कोठारात पहाटे साडेतीनच्या सुमारास स्फोट होऊन आग लागली, त्यानंतर आणखी तीन स्फोट झाले. ही घातपाताची शक्‍यता असल्याची शंका व्यक्त करण्यात आलेली आहे. 

सुमारे 700 हेक्‍टर क्षेत्रफळात पसरलेल्या या कोठारांमध्ये 88,000 टनापेक्षा अधिक दारूगोळ्याचा साठा करण्यात आलेला आहे. कोठारातील शक्तिशाली स्फोटानंतर हादऱ्यामुळे जवळपासच्या गावांतील घरांच्या दारेखिडक्‍या मोडून पडल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. 

दारूगोळा कोठारातील स्फोट आणि आगीनंतर इच्नीया सभोवतीचा 30 किमीचा हवाई परिसर बंद करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे रेल्वे आणि सडक वाहतूक बंद करण्यात आली आहे. स्फोटानंतर युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांनी आपल्या वरिष्ट अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. पंतप्रधान आणि अन्य अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)