नोटाबंदीनंतर विवरणपत्रे न भरलेली 80 हजार प्रकरणे रडारवर 

नवी दिल्ली – नोटाबंदीनंतर नोटिसा बजावूनही कर विवरणपत्रे न भरण्यात आलेली सुमारे 80 हजार प्रकरणे प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. याशिवाय, मागील तीन वर्षे विवरणपत्रे सादर केलेले; मात्र चालू वर्षी तसे न करणारे तब्बल 80 लाख लोकही हेरण्यात आले आहेत.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली. नोटाबंदीनंतर विवरणपत्रे न भरण्यात आल्याबद्दल 3 लाखांहून अधिक नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतर सुमारे 2.25 लाख विवरणपत्रे सादर करण्यात आली. विवरणपत्रे सादर करण्यासाठी आम्ही प्रथम एसएमएस पाठवतो. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यास नोटिसा बजावल्या जातात. आगामी काळात मोठ्या संख्येने विवरणपत्रे सादर होण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले. नोटाबंदीमुळे कर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली.

-Ads-

प्रत्यक्ष करांद्वारे मिळणारा देशाचा महसूल वाढला. मागील वर्षी प्रत्यक्ष करांचा वाटा 52 टक्के तर अप्रत्यक्ष करांचा वाटा 48 टक्के इतका होता. प्रत्यक्ष करांचा वाटा वाढण्याची घडामोड अनेक वर्षांतून घडली, अशा शब्दांत त्यांनी नोटाबंदीचे फायदे नमूद केले. चालू वर्षी 6 कोटींहून अधिक विवरणपत्रे सादर झाली. ती सादर करणाऱ्यांत 86 लाख नव्या करदात्यांच्या समावेश असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)