अखेर कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंहही निवडणूक रिंगणात

भोपाळ मधून लढणार निवडणूक

मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिलेले आव्हान स्वीकारले !

भोपाळ – ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी त्यांना दिलेले आव्हान स्वीकारले असून त्यांनी भोपाळ मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दिग्विजयसिंह यांनी निवडणूक लढवायचे ठरवले तर त्यांनी अवघड मतदार संघातून आपली उमेदवारी जाहीर करावी असे आव्हान त्यांना थेट मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिले होते. त्यांनी दुसऱ्याच दिवशी हे आव्हान स्वीकारले आहे.

भोपाळ मतदार संघ 1989 पासून भारतीय जनता पक्षाकडे आहे. पुर्वी या मतदार संघातून माजी राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा हे निवडून येत. त्या मतदार संघातून दिग्विजयसिंह हे कॉंग्रेसच्या तिकीटवर निवडणूक लढवणार आहेत.

स्वता मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आज त्यांच्या उमेदवारीची पुष्टी केली. ते म्हणाले की दिग्विजयसिंह हे मध्यप्रदेशचे बराच काळ मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी आपल्या परंपरागत राजगढ मधून निवडणूक न लढवता कोणत्या तरी आव्हानात्मक मतदार संघातून निवडणूक लढवावी. भोपाळ, इंदुर, जबलपुर यापैकी कोणत्याही मतदार संघातून त्यांनी उमेदवारी लढवावी अशी विनंती मी त्यांना केली. त्यावर त्यांनी माझी विनंती स्वीकारून भोपाळ मधून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी त्यांच्या उमेदवारीची लगेचच घोषणाही केली. दिग्विजय सिंह हे सन 1993 ते 2003 या काळात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत.

सध्या अलोक संजर हे भाजपचे भोपाळ मधील विद्यमान खासदार आहेत. त्यांनी गेल्यावेळी या मतदार संघातून 3 लाख 70 हजार मतांनी विजय मिळवला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)