‘एक महिना होऊनही पाकिस्तान अजून मृतदेह मोजत आहेत व विरोधक पुरावे मागत आहेत’

नवी दिल्ली – देशातील जनतेला भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. परंतु, आपल्या विरोधकांना विश्वास नाही. एक महिना झाला पाकिस्तान अजूनही मृतदेह मोजत आहेत आणि हे लोक पुरावे मागत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. ते आज ओडिशामध्ये सभेला संबोधित करत होते. सुरुवातीला मोदींनी शहीदांना नमन केले. व तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यास हा चौकीदार तुमच्यामध्ये आला आहे, असे त्यांनी म्हंटले.

पंतप्रधान मोदी म्हणाले कि, मी संपूर्ण देशाचे आभार मानण्यासाठी निघालो आहे. ओडिशाच्या सम्मान, आशीर्वाद आणि समर्थनामुळे मी खूप काही करू शकलो. ओडिशाच्या विकासात तुमच्या सेवकाने कोणतीही कसर सोडली नाही. माझ्या ५ वर्षांच्या यशाचे खरे श्रेय देशाच्या जनतेला आहे. हे नव्या भारताच्या नव्या आत्मविश्वासाची ताकद आहे, ज्यावर आज पूर्ण भारत गर्व करत आहे.

ते पुढे  म्हणाले, जेव्हा भारत दहशतवाद्यांवर कारवाई करत होते, घरात घुसून मारत होता. तेव्हा हेच लोक पुरावे मागत होते. देशातील जनतेला भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. परंतु, आपल्या विरोधकांना विश्वास नाही. एक महिना झाला पाकिस्तान अजूनही मृतदेह मोजत आहेत आणि हे लोक पुरावे मागत आहेत. मतदान  करताना एका गोष्ट मनाशी निश्चित करा कि, तुम्हाला दहशतवाद्यांना घरात घुसून मारणारे सरकार हवे आहे का डोके खाली घालणारे सरकार हवे आहे, असेही मोदींनी म्हंटले.

https://twitter.com/ANI/status/1111511430950473728

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)