बारा वर्षानंतर ‘या’ चित्रपटाव्दारे अमिताभ-अक्षय एकत्रित

बॉलीवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांच्यात आज वयाच्या 71व्या वर्षीही प्रत्येक भूमिका दमदारपणे साकारण्याची क्षमता आहे. बीग बी लवकरच ‘कंचना’ या तमिळ चित्रपटाच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहेत. या चित्रपटात अमिताभ पहिल्यांदाच एका ट्रांसजेंडरची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात तब्बल 12 वर्षानंतर अक्षय कुमार अमिताभसोबत मोठ्या पडद्यावर काम करणार आहे.

तमिळमधील सुपरहिट ठरलेल्या ‘कंचना’चा हिंदी रीमेक साकारण्यात येत आहे. यात बीग बी कंचनाची भूमिका करणार आहेत. चित्रपटाच्या कथेत कंचना एक ट्रांसजेंडर महिला असून ती आपल्या हत्येचा बदला घेण्यासाठी राघवच्या शरीर निवडते. मुळ चित्रपटात कंचनाची भूमिका आर. शरद कुमार याने साकारली होती.

चित्रपटात अक्षय कुमार मुख्य रोल प्ले करणार असून त्याच्या पत्नीची भूमिका कियारा आडवाणी साकारणार आहे. तसेच तब्बल 12 वर्षानंतर अमिताभ-अक्षय कुमार एकत्रित दिसणार असल्याचे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “बदला’ चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगला गल्ला जमविला होता. तसेच अमिताभ बच्चन यांचा बिग बजेट असलेला “ब्रह्मास्त्र’ लवकरच प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)