रात्री 11 नंतर हॉटेल्स, रेस्टॉरंट वाईन शॉपींवर मद्यपींची झुंबड

नियमांचे होतंय उल्लंघन; महामार्गासह शहरात स्थिती; पथक केवळ नावालाच

नगर: महापालिका निवडणुकीमुळे रात्री अकरानंतर हॉटेल्स, रेस्टॉरंट व वॉईन शॉपी बंद होणे आवश्‍यक आहे. अर्थात तसेच आदेश पोलीस प्रशासनाने दिले असतांनाही शहरासह महामार्गावरील हॉटेल्स, रेस्टॅरंट रात्री अकरानंतरही खुलेआम सुरू असतात. हॉटेल्स व रेस्टॉरंटचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले असले तरी वाहनतळावर वाहनांची तोबा गर्दी असते. त्यामुळे हे हॉटेल्स व रेस्टॉरंट म्हणायला रात्री 11 नंतर बंद असले तरी आतमध्ये सर्रास मद्यपींची झुंबड दिसू येत आहे.

महापालिका निवडणुकीमुळे सायंकाळी आठनंतर परवानाधारक बिअरबार व परमीट रुममध्ये गर्दी होत आहे. परंतू रात्री 11 वाजल्यानंतरही हे हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू असतात. त्यामुळे महापालिका निवडणुकीत या हॉटेल चालकांना रात्री उशीरापर्यंत हॉटेल चालू ठेवण्याचा परवानाच मिळाला की काय अशी शंका व्यक्‍त होते. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसवा. या हेतूने निवडणूक अधिकाऱ्यांनी सहा भरारी पथक स्थापन केले आहेत. परंतू ही पथके नावालाच असल्याचे दिसत आहे. हॉटेल्स चालू असल्याचे दिसून देखील हे पथक पुढे जात आहे. अर्थात हॉटेल चालक प्रवेशद्वार बंद करून आतमध्ये सर्रास रात्री उशीरापर्यंत हॉटेल चालू ठेवतात. विशेष म्हणजे प्रवेशद्वार बंद असले तरी हॉटेलच्या वाहनतळामध्ये मोठ्या संख्येने वाहने उभी असतात. त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक देखील तपासणी करीत आहेत. मध्यतंरी माळीवाडा भागातील एक हॉटेलवर छापा टाकून परवाना नसतांनाही दारू विक्रीचा प्रकार उघडकीस आला. त्याबरोबर तब्बल 13 हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. असे असे तरी हॉटेल्स व रेस्टॉरंटवर काही फरक पडला नाही. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हॉटल्स व रेस्टॉरंटमधील गर्दी चांगलीच वाढली आहे. शहरातील हॉटेल्सबरोबर महामार्गावर असलेल्या हॉटेल व ढाब्यावर आता गर्दी वाढली आहे. महामार्गावर रात्री उशीरापर्यंत हॉटेल चालू ठेवण्यात येतात.या हॉटेल्समध्ये नेहमीपेक्षा जास्त गर्दी आता दिसत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

पोलीस पथकांवर असतो वॉच

हॉटेल्स व रेस्टॉरंट रात्री उशीरापर्यंत चालू रहावे यासाठी रस्त्यावर खास माणसांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. रस्त्यांवरून येणाऱ्या जाणाऱ्या पोलीस पथकांवर वॉच ठेवण्याचे काम या माणसाकडून केले जात आहे. पोलीस वाहन दिसताच मोबाईलवरून निरोप दिला जातो. त्यानंतर हॉटल्स व रेस्टॉरंटमधील दिवे बंद करण्यात येतात. पोलीस वाहन गेल्यानंतर पुन्हा हे दिवे चालू होतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)