आफ्रिदीमुळे माझी कारकीर्द संपली : सलमान बट

पाकिस्तान किक्रेट संघाचा माजी कर्णधार सलमान बटला 2010 साली झालेल्या स्पॉट फिक्‍सींग प्रकरणात 5 वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2016 साली भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी सलमानला पाक संघात पुनरागमन करण्याची संधी होती. यासाठी आपण स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवातही केली होती, मात्र 2015 साली माझी बंदी उठल्यानंतरही आफ्रिदीने माझी निवड होऊ दिली नाही, असा आरोप बटने एका स्थानिक वहिनीशी बोलताना केला आहे.

बट पुढे म्हणाला, राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमधून त्यावेळचे प्रशिक्षक वकार युनिस आणि फलंदाजी प्रशिक्षक ग्रॅंट फ्लॉवर यांनी माझ्याशी संपर्क केला होता.त्यांना वकार यांनी मला पाकिस्तानच्या संघात खेळण्यास सज्ज हो असे सांगितले. मी काही काळ फलंदाजीचा सरावही केला. माझे संघात पुनरागमन निश्‍चित मानले जात असतानाशाहीद आफ्रिदीने हरकत घेतली आणि माझे पुनरागमन होऊ शकले नाही.

याबाबत मी कधी त्याच्याशी बोललो नाही. परंतु, माझी क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली, असेही बट म्हणाला. स्थानिक क्रिकेटमध्ये सतत चांगली कामगिरी करत असूनही त्यावेळी माझी संघात निवड झाली नाही याचे मला दुःख आहे, असेही बटने सांगितले. 2016च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी खराब झाले होती. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक वकार युनिस यांना राजीनामा द्यावा लागला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)